लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा व्यवस्थापन
12 November 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा व्यवस्थापन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा व्यवस्थापन

मृगबहारातील संत्रा फळे वाढीकरिता जिब्रेलिक अॅसिड १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) + पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१ किलो) + १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याकरिता चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण ०.२ टक्के फवारणी करावी. ओलावा करिता दुहेरी आळे किंवा ठिबक सिंचन पद्धत दुहेरी-नळी पद्धतीचा अवलंब करावा. पाण्याचा खंड पडू देऊ नये. आच्छादन १० सेमी थर अथवा पॉलीथीनचे आच्छादनाचा वापर करावा.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी),
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या