कापूस सल्ला: कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य साठवण कशी करावी? (भाग-१).
07 November 07:00

कापूस सल्ला: कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य साठवण कशी करावी? (भाग-१).

कापूस सल्ला: कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य साठवण कशी करावी? (भाग-१).

प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.
कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा.
वेचणीच्या काळात पाउस पडल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा.
शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला ‘झोडा’ असे संबोधले जाते. अशा कापसाची रूई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टी. एच. राठोड
कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या