लिंबूवर्गीय पिके सल्ला: आंबिया बहारातील संत्रा फळ काढणी
05 November 07:00

लिंबूवर्गीय पिके सल्ला: आंबिया बहारातील संत्रा फळ काढणी


लिंबूवर्गीय पिके सल्ला: आंबिया बहारातील संत्रा फळ काढणी

आंबिया बहारातील संत्रा फळांची काढणी ३० नोव्हेंबर पर्यंत उरकावी. काढणी करण्याचे १५ दिवस अगोदर कार्बेन्डेझीम ०.१ टक्के (१०० ग्रॅम) + १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी, यामुळे फळे वाहतुकी दरम्यान टिकून राहतात.

पुढे येणाऱ्या आंबिया बहाराचे नियोजनासाठी जानेवारीच्या पहिल्या किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झाडाचा ताण तोडला असल्यास १५ नोव्हेंबरपर्यंत नत्रयुक्त खताची हलकी मात्रा अमोनियम सल्फेटद्वारे द्यावी.

संत्राफळे काढणीनंतर पोटॅशियम नायट्रेट १ टक्का द्रावणाची फवारणी (१० ग्रॅम प्रति लिटर) व चिलेटेड मायक्रोन्युट्रीयंट मिक्स ०.२ टक्के ( २ ग्रॅम प्रती लिटर) फवारणी करावी.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ).

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या