कांदा सल्ला: खरीप कांदा पिकाच्या काढणीकरिता
04 November 07:00

कांदा सल्ला: खरीप कांदा पिकाच्या काढणीकरिता


कांदा सल्ला: खरीप कांदा पिकाच्या काढणीकरिता

खरीप कांदा पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागणीनंतर १०० दिवसांनी करावी. खरीपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. असा वेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरित्या माना पाडाव्या लागतात. शेत कोरडे असताना पीक काढणी करावी.

खरिपात काढणीच्यावेळी पावसाची नेहमीच शक्यता असते. जर २-३ दिवस पावसाची शक्यता वाटत असल्यास पिकाची काढणी पुनर्लागणीनंतर लवकर म्हणजे ९०-१०० दिवसांनी सुद्दा करता येईल. मात्र असे कांदा तांबडतोब बाजारात विकावा.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या