द्राक्ष सल्ला: छाटणीनंतरचे नियोजन
28 October 07:00

द्राक्ष सल्ला: छाटणीनंतरचे नियोजन


द्राक्ष सल्ला: छाटणीनंतरचे नियोजन

द्राक्ष बागेत यावेळी फळ छाटणी झाली असेल, काही ठिकाणी फळ छाटणी सुरु असेल व काही ठिकाणी पावसामुळे द्राक्ष छाटणी झालेली नसेल. पावसामुळे पानगळ करता येत नाही त्यामुळे द्राक्ष छाटणी झाली नसेल. लवकर येणाऱ्या जातीत जिथे फळ छाटणी झाली असेल तिथे फुटी येण्यास सुरुवात होऊन घड सुद्धा बाहेर निघत असेल. अशावेळी वातावरण अनुकूल असल्यास वाढ चांगली होते परंतु पावसाळी किंवा ढगाळ वातावरण असल्यास वाढ खुंटल्यासारखी दिसू शकते अशावेळी एका काडीवर चार डोळ्याला पेस्टिंग केल्यास एका काडीवर चार फुटी निघतात त्यामुळे वेलीवरती गर्दी होण्याची शक्यता असते व पाऊस पडल्यास आर्द्रता वाढून केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. घड निघण्याच्या अवस्थेत वातावरण बदलल्यास अशावेळी घड जिरण्याची किंवा गोळी घड (लहान आकाराचे द्राक्ष मणी) निघण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी बागेत बोदात पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी. बोदातून पाणी काढण्यासाठी लहान चरी काढावी.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या