लिंबूवर्गीय पीक सल्ला: पाणी नियोजन
22 October 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला: पाणी नियोजन


लिंबूवर्गीय पीक सल्ला: पाणी नियोजन

बागेमध्ये आच्छादनाचा वापर करावा व शक्यतोवर ड्रिपचा वापर करावा. ड्रिपद्वारे पाण्याचे नियोजन करावयाचे असल्यास झाडाचे आकारमान व या महिन्यात प्रती दिन होणारे बाष्पोत्सर्जन लक्षात घेऊन करावे. दुहेरी नळ्या पद्धतीने किंवा गोलाकार रिंग नळीद्वारे झाडाचे घेराचे भागात ड्रिपद्वारे पाणी द्यावे. आळ्यात ओलीत करत असल्यास दुहेरी आळे पद्धतीचा अवलंबून करून पाण्याचा झाडाचे खोडाशी संपर्क टाळावा.

संत्रा/लिंबू व मोसंबी झाडाचे खोडाला ३ फूट उंची पर्यंत बोर्डो मलम १० टक्के (१ किलो मोरचूद + १ किलो चुना + १० लिटर) लावावा.
लिंबामध्ये हस्तबहाराचे नियोजन केले असल्यास १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाडांना दुहेरी आळे करून ओलीत करावे. ताण तोडतांना पोटॅशियम नायट्रेट २ टक्के (२ किलो) + १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. झाडांना नत्राची अर्धी मात्रा + स्फुरद व पालाश संपूर्ण मात्रा वयापरत्वे द्यावी. या महिन्यात फळमाशी व रसशोषण करणाऱ्या पतंगामुळे फळगळ संभवते. याकरिता खबरदारीचे उपाययोजना करावेत.

डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या