भाजीपाला सल्ला: मुळवर्गीय भाजीपाला सुधारित जाती
19 October 07:00

भाजीपाला सल्ला: मुळवर्गीय भाजीपाला सुधारित जाती


भाजीपाला सल्ला: मुळवर्गीय भाजीपाला सुधारित जाती

मुळवर्गीय भाजीपाला-
जापनीज व्हाईट, पुसा चेतकी, पुसा देशी या मुळयाच्या वाणांची लागवड ऑक्टोबर महिन्यांत करतात. गाजराच्या पुसा केसर, पुसा मेघाली किंवा नान्टीज यापैकी वाणाची निवड करावी. मुळयाचे 8-10 किलो बियाणे तर गाजराचे 5-7 किलो बियाणे प्रती हेक्टरी पुरेसे होते. सरी वरंब्याच्या वाफ्यामध्ये 45 × 10 सेंमी अंतरावर मुळयाचे आणि गाजराच्या बियाण्यांची वरंब्याच्या बगलेस पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास 25 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास लावावे.

-एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं दे कृ वि.,अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या