लिंबूवर्गीय पीक सल्ला: मृगबहारातील संत्रासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन
17 October 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला: मृगबहारातील संत्रासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन


लिंबूवर्गीय पीक सल्ला: मृगबहारातील संत्रासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

मृगबहारातील संत्रा फळ झाडावर चिलेटेड स्वरूपातील मिश्र सूक्ष्मअन्नद्रव्याची 0.1 टक्के (1 ग्रॅम प्रती लिटर) फवारणी किंवा झिंक सल्फेट 0.3 टक्के, फेरस सल्फेट 0.2 टक्के, मँग्नीझ सल्फेट 0.3 टक्के फवारणी करावी. मृगबहारातील संत्रा फळांची फळधारणा उशीरा झाल्याने फळे आकाराने लहान असल्यास फळांची वाढ वेगाने होण्याकरिता जिब्रेलिक अॅसिड 15 पीपीएम (1.5 ग्रॅम) + पोटॅशियम नायट्रेट 1 टक्के (1 किलो) + 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

7 वर्षे वयावरील मृग बहारातील फळे असल्यास झाडांना एकूण मात्रेच्या 20 टक्के नत्र + 25 टक्के स्फुरद + 20 टक्के पालाश जमिनीतून द्या. लहान संत्रा/लिंबू/मोसंबी फळझाडे ज्यांना अद्यापी फळ धारणा सुरू होण्याची आहे अशा फळ झाडांना एकूण मात्राच्या 1/3 नत्र, स्फुरद व पालाश वयापरत्वे द्यावा.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या