भाजीपाला सल्ला: कोबीवर्गीय भाजीपाला सुधारित जाती
10 October 07:00

भाजीपाला सल्ला: कोबीवर्गीय भाजीपाला सुधारित जाती


भाजीपाला सल्ला: कोबीवर्गीय भाजीपाला सुधारित जाती

कोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये लवकर येणा-या हळव्या व उशिरा येणा-या जातींचा समावेश होतो. फुलकोबीच्या अर्ली कुवारी, पुसा दिपाली या लवकर येणा-या तसेच अघाणी, पुसा सिंथेटीक या हळव्या तर स्नोबॉल 1, स्नोबॉल 16 या उशिरा येणा-या जातींपैकी निवड करावी. तसेच पानकोबीच्या गोल गडडे येणा-या जाती गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, कोकण हेगण, मार्केट तर पुसा ड्रम हेड, अर्ली ड्रम हेड हया जातींची गरजेनुसार निवड करावी. हेक्टरी 600 ते 750 ग्रॅम फुलकोबीचे बियाणे व हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम पानकोबीचे बियाणे वापरून 4 ते 6 आठवडयाचे गादी वाफ्यावरील रोपे तयार करून 45 × 45 किंवा 60 × 60 सें.मी. अंतरावर लागवड करावी.

-एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं दे कृ वि.,अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या