भाजीपाला सल्ला: रब्बी भाजीपाला लागवडीच्या तयारीस उपयुक्त काळ
03 October 07:00

भाजीपाला सल्ला: रब्बी भाजीपाला लागवडीच्या तयारीस उपयुक्त काळ


भाजीपाला सल्ला: रब्बी भाजीपाला लागवडीच्या तयारीस उपयुक्त काळ

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांची लागवड करण्यास सुरूवात करण्यात येते. उदा. कोबीवर्गीय भाजीपाला पीक जसे फुलकोबी, पानकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट तसेच कंदवर्गीय उदा. कांदा, लसूण, मुळवर्गीय उदा. गाजर व मुळा आणि पालेवर्गीय उदा. पालक, मेथी या पिकांची लागवड करतात. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात उष्णता व दमटपणा यांचा मिलाफ अनुभवास मिळतो. त्यामुळे या हंगामात काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण सर्व भाजीपाला पिकांची शारीरिक वाढ संपून पुनरूत्पादीत वाढीची अवस्था, लवकर येणा-या कोबीवर्गीय पिकांची काढणीची अवस्था, कंदवर्गीय व मुळवर्गीय भाजीपाल्यांची काढणीची अवस्थेमध्ये फरक झालेला आढळतो.

-एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं दे कृ वि., अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या