लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे तोडणी व व्यवस्थापन
01 October 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे तोडणी व व्यवस्थापन


लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे तोडणी व व्यवस्थापन

आंबिया बहारातील संत्रा फळे तोडणीस आली असल्यास फळे तोडणीचे 15 दिवस अगोदर पाणी बंद करावे. तोडणीच्या 15 दिवस अगोदर कार्बेन्डेझीम 0.1 टक्के (1 ग्रॅम/लिटर पाण्यात) फवारणी करावी त्यामुळे संत्रा फळे वाहतुकी दरम्यान टिकून राहतात. फळे तोडतांना शक्यतो फळाला 5 मिमी देठ ठेवावा.फळे झाडावरच अधिक काळ ठेवायची असल्यास फळाला रंग येण्याचे अगोदर जिब्रेलीड अॅसिड 15 पीपीएम (1.5 ग्रॅम) + युरिया 1 टक्का (1 किलो) + कार्बेन्डेझीम 0.1 टक्का (100 ग्रॅम) + 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या