द्राक्ष सल्ला: जैविक रोग नियंत्रण उपाय
23 September 07:00

द्राक्ष सल्ला: जैविक रोग नियंत्रण उपाय


द्राक्ष सल्ला: जैविक रोग नियंत्रण उपाय

पावसामुळे द्राक्ष बागेत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्यास अशा परिस्थितीमध्ये बागेत जैविक नियंत्रणावर जास्त जोर द्यावा. यामुळे ज्या ठिकाणी फवारणीची बुरशीनाशके पोहचत नाहीत अशा कॅनॉपीमध्ये जैविक घटक (उदा. ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, व्हर्टीसिलियम) वापरावे. 2-3 फवारण्या परिस्थिती पाहून केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. तेव्हा याचा ड्रिपमधून सुद्धा ड्रेचिंग 5 ग्रॅम/मिली प्रती लिटर प्रमाणे प्रती वेल 1 लीटर प्रमाणे ड्रेचींग केल्यास त्याचे चांगले फायदे मिळतील.

काही परिस्थितीमध्ये काड्या तारेवर बांधून प्रत्येक काडी मोकळी राहील याकडे जास्त लक्ष घ्यावे. यामुळे कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी होईल व त्यामुळेच रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या