कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती
18 September 07:00

कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती


कांदा सल्ला: पुनर्लागण पद्धती

पुनर्लागणीकरिता कांद्याची रोपे निवडताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील 1/3 भाग पुनर्लागणीपूर्वी कापून टाकावा.

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी.रोपांची चांगली वाढ होण्याकरिता पुनर्लागणीच्या वेळी व पुनर्लागणीच्या तीन दिवसानंतर पाणी देण्याची गरज असते.

-डॉ.शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,410505, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या