भाजीपाला पीक सल्ला: वरखते व्यवस्थापन आणि आंतरमशागत
23 August 07:00

भाजीपाला पीक सल्ला: वरखते व्यवस्थापन आणि आंतरमशागत


भाजीपाला पीक सल्ला: वरखते व्यवस्थापन आणि आंतरमशागत

जून जुलै महिन्यात लागवड केलेल्या वांगी, टोमॅटो, मिरची आणि भेंडी इत्यादी भाजीपाला पिकाला वरखताचा दुसरा हप्ता लागवडीनंतर 30 दिवसांनी दयावा. वांगी या पिकाला हेक्टरी 30 किलो नत्र आणि टोमॅटोला हेक्टरी 50 किलो नत्र तसेच भेंडीला हेक्टरी 25 किलो नत्र दयावा. वरखते झाडाभोवती बांगडी पध्दतीने दयावे व हलक्या मातीने झाकावे. खते देते वेळीस जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. नसल्यास खते दिल्यानंतर लगेच हलके पाणी दयावे. शक्य असल्यास वरील फळभाजीपाला पिकांना हेक्टरी 5 ते 7 क्विंटल निंबोळीची ढेप फेकणी पध्दतीने दयावी. पिकाला वाढीकरीता वेळेावेळी गरजे इतकेच पाणी दयावे व पीक तणविरहीत ठेवावे.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या