पीक सल्ला: भाजीपाला पिकांना बांगडी पद्धतीने वरखते दया
30 June 07:00

पीक सल्ला: भाजीपाला पिकांना बांगडी पद्धतीने वरखते दया


पीक सल्ला: भाजीपाला पिकांना बांगडी पद्धतीने वरखते दया

लागवडीपूर्वी माती परिक्षण केलेले आहे असे अपेक्षित असून आपल्या जमिनीत ज्या मुलद्रव्यांची कमतरता असेल त्या मुलद्रव्याची खत मात्रा जमिनीत योग्य ओलावा असतांना बांगडी पध्दतीने पूर्ण करावी. वेगवेगळी वरखते शिफारशीत मात्रे प्रमाणे दयावी.मिरची,टोमॅटो व वांगी या पिकांच्या लवकर येणा-या जातीच्या रोपांचे स्थलांतर करून 30 दिवस झाले असल्यास अशा स्थलांतरित रोपांना नत्राची दुसरी मात्रा देण्याची गरज आहे. नत्राचा दुसरा हप्ता देतांना प्रत्येक रोपाभोवती बांगडी पद्धतीने (गोल) जमीन उकरून त्यात खत टाकावे व नंतर त्यावर थोडी माती टाकून खत झाकून घ्यावे.तसेच बी पेरणी/टोकनी केलेल्या पिकांच्या बाबतीत दुसरी नत्राची मात्रा पिकांच्या तासांमध्ये/ओळीमध्ये पेरून दयावी.

-डॉ. एस.एम. घावडे
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या