द्राक्ष सल्ला; फुटीचे नियंत्रण
24 May 07:00

द्राक्ष सल्ला; फुटीचे नियंत्रण


द्राक्ष सल्ला; फुटीचे नियंत्रण

द्राक्ष बागेत येणाऱ्या नवीन फुटीपासून थांबा आणि पुढे चला यापद्धतीने खोड तयार करतांना नवीन निघालेली फुट दहा पानांवर गेल्यावर त्यांना सहा ते सात पानांवरच शेंडा खुडून घ्यावा. त्यामुळे खालच्या पानांवरचे डोळे फुटतील. या फुटी तीन ते चार पानांवर खुडून टाकावे. वरची शेवटची फुट न खुडता तिला शेवटी तारेने बांबूला बांधून घ्यावे. त्यामुळे ती फुट जोरात वाढेल. ही फुट ओलांड्याजवळ किंवा तारेजवळ पोहचल्यावर तिला पुन्हा एकदा काप द्यावा. खाली निघालेल्या फुटी तीन ते चार पानांवर थांबविल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या मदतीने ही पाने अन्नद्रव्य तयार करतात. वरच्या दोन फुटी डावीकडे व उजवीकडे वळवून ओलांडा तयार करावा. ओलांडा तयार केल्यावर परत तारेजवळ जाऊन शेंडा खुडावा. त्यातून निघालेल्या फुटीनुसार फळ काड्यासाठी आवश्यक असणारा मुख्य ओलांडा टप्प्याटप्प्याने तयार करावा.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स

संबंधित बातम्या