केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग १
19 March 07:00

केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग १


केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग १

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

• नवीन लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून, योग्य अंतरावर सऱ्या पाडाव्यात. अंतर ५ X ५ फुट ठेवावे.
• लागवडीसाठी उतीसंवर्धीत रोपे एकसारख्या वाढीची. ३० ते ४५ सेमी उंचीची, ६ ते ७ पाने असलेली असावीत.
• केळी लागवड कंदापासून करायची असल्यास, कंद/ मुनवे निरोगी, जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३-४ महिन्याचे, ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. बेण्यावरील माती, मुळ्या कोयत्याने काढाव्यात. कंदावर ३-४ रिंगा ठेऊन खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. यामुळे सुत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होते. शिवाय खोडकिडीचा उपद्रव आढळल्यास असे बेणे अलग करता येते. त्यानंतर १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझीम आणि १५० मिली अॅसीफेट घेऊन त्यामध्ये ३० मिनिटे बेणे बुडवून मगच लागवड करावी.

डॉ. विक्रांत भालेराव, सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळे

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82टॅग्स

संबंधित बातम्या