टोमॅटोवरील नागआळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे व नियंत्रणाचे उपाय..
19 February 07:00

टोमॅटोवरील नागआळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे व नियंत्रणाचे उपाय..


टोमॅटोवरील नागआळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे व नियंत्रणाचे उपाय..

टोमॅटो मध्ये सर्वात हानिकारक कीड म्हणजे नाग आळी, नाग आळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासूनच होतो तो टाळण्यासाठी खालील कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
- टोमॅटो पीकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.
- या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.
- काळी माशी पानाच्या मागील बाजूने एकावेळी १५० ते २५० पर्यंत अंडी घालते.
- सुमारे ९ ते १० दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात.
- पानाच्या दोन शिरामध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते.
- ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात.
- दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते.
- १५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते.
- या किडीने टोमॅटो पिकाचा दर्जा बिघडतो.
- नागळीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाच्या पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते.
- हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो.
- पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.

उपाय
१. सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी (बेनिविया):- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.(३६० मिली प्रति एकर)

२.क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोक्झाम १७.५ एस.सी. (व्हॉलीयम फ्लेक्सी):- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी २०० मिली प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून आळवणी करणे.

श्री. राजु गाडेकर, (एम एस सी फळशास्त्र)
-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी, कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82संबंधित बातम्या