केळी सल्ला: तापमान वाढीमुळे पाणी नियोजनाकडे लक्ष द्या.
05 February 07:00

केळी सल्ला: तापमान वाढीमुळे पाणी नियोजनाकडे लक्ष द्या.


केळी सल्ला: तापमान वाढीमुळे पाणी नियोजनाकडे लक्ष द्या.

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

सद्य स्थितीत जून जुलै मध्ये लावलेली मृग बाग व ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावलेली कांदे बाग उभी आहे. मृग बाग घड निसवणीच्या/ पक्वतेच्या अवस्थेत तर कांदे बाग मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीची तयारी करणे गरजेचे आहे. अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचा अंश कमी होतो आणि पाणी न मिळाल्यास झाडांची मुळे कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडतात.

उन्हाळ्यातील अधिक तापमान व अल्प आर्द्रता यांचा संयुक्तरीत्या केळीच्या झाडावर तीव्र असा विपरीत परिणाम होतो. केळीचे पिक ३५ डि.सें. तापमानाला अधिक सहनशील आहे. परंतु ३८ डि.सें. च्या पुढे तापमान गेल्यास प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे झाडांची पाने पिवळी पडतात व नंतर करपतात. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्यांवर पडणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे केळी काळी पडते. वातावरणातील ४५ डि.सें. पेक्षा अधिक तापमान गेल्यास जमिनीतील पाण्याचा अंश बाष्पीभवनामुळे कमी होतो अशा वेळेस पाणी न दिल्यास झाडांची मुळे कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडतात.

डॉ. विक्रांत भालेराव, सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळे

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82संबंधित बातम्या