केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण
22 January 07:00

केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण


केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण

या किडींचा प्रादुर्भाव खोड, फुल आणि कोवळया फळांवर आढळून येतो. फुलकिडे केळीच्या सालीत अंडी घालतात. बाल्यावस्था बाहेर आल्यानंतर त्याठिकाणी अन्नरस बाहेर येतो.
पिले व प्रौढ अपरिपक्व अवस्थेत केळीची साल खरवडून त्यातील रस शोषतात. फळांवर तांबूस तपकरी किंवा काळसर चट्टे पडतात. साल खरबरीत होऊन फळांची गुणवत्ता खराब होते त्यामुळे बाजारभाव मिळत नाही.
नियंत्रण- बाग स्वच्छ ठेवावी. संपर्ण फण्या निसवल्यानंतर केळफूल तोडावे. गरजेनुसार
व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रती लिटर किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी, कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82टॅग्स

संबंधित बातम्या