भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग १
07 January 07:00

भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग १


भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग १

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वांगी आणि टोमॅटोची रोपवाटीकेत लागवड करावी. वांगी पिकाच्या अरूणा, मांजरी गोटा, पुसा पर्पल राउंड, पुसा पर्पल लाँग आणि टोमॅटोच्या मार्ग्लोब, पुसा रूबी, पंजाब छुआरा, एस-१२०, भाग्यश्री, धनश्री, अरका सौरभ ई. सुधारीत जाती आहेत.

एक हेक्टर वांगी लागवडीकरीता ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे लागते. टोमॅटो आणि वांगीच्या रोपाची तयारी करण्यासाठी जागा चांगली वखरून भुसभुशीत करून घ्यावी. जमिन उत्तम निचरा होणारी निवडावी. गादी वाफे १ मी. लांब, १ मी. रूंद आणि १५ सेंमी उंच आकाराचे तयार करावेत. वांगी व टोमॅटोच्या एक हेक्टर लागवडीकरीता या आकाराच्या २० ते २५ वाफ्यातील रोपे पुरेशी होतात. वाफे तयार करण्यापुर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत प्रती २ चौ.मी. या जागेला २ किलो या प्रमाणात टाकुन मिसळावे. रोपवाटीकेत २ चौ.मी. जागेला २ ग्रॅम नत्र, १० ग्रॅम स्फुरद, १० ग्रॅम पालाश दयावे. त्यापैकी संपुर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धे नत्र बी पेरणीच्यावेळी दयावे. उरलेले नत्र २० ते २५ दिवसांनी दयावे.

-डॉ. एस.एम. घावडे , मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82संबंधित बातम्या