भाजपकडून पीक विमा योजनेसंदर्भांत राजकारण- ममता बॅनर्जी
29 December 08:30

भाजपकडून पीक विमा योजनेसंदर्भांत राजकारण- ममता बॅनर्जी


भाजपकडून पीक विमा योजनेसंदर्भांत राजकारण- ममता बॅनर्जी

कृषिकिंग, कोलकाता: भारतीय जनता पार्टी (भाजपा) पश्चिम बंगालमध्ये पीक विमा योजनेसंदर्भांत राजकारण करत असून, खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत आहे. असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

राज्य सरकार पीक विमा योजनेत ८० टक्क्यांचा वाटा उचलत आहे. मात्र, सर्व निधी हा केंद्र सरकार देत असल्याचे सांगून भाजप शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. मी जर माझ्या शेतकऱ्यांना ८० रुपये देत आहे, तर मला उर्वरित २० रुपये देणेही काही अवघड नाही. पश्चिम बंगाल सरकार केंद्र सरकारवर अवलंबून नाही. असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.संबंधित खबरें