वाचकांच्या प्रतिक्रिया

मी कृषिरसायने पुस्तक घेतल्यामुळे औषधांचा खर्च कमी झाला आणि औषध फवारणीची योग्य ती माहिती समजली. कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर कोणत्या रासायनिक औषधांची फवारणी करावी. हे मला या पुस्तकातून समजले. पुस्तक छान आहे. अशी अजून उपयोगी माहिती असल्यास सांगा.

face

हरेश सदाशिव चौधरी

मु.पो.ममुराबाद, तालुका-जिल्हा- जळगाव.

कृषिरसायने पुस्तक मला मिळाल्यानंतर मी स्वतः कृषी केंद्रामध्ये जाऊन, मला हवी असलेली औषधे आणली व त्यांचा मला माझ्या टोमॅटो पिकासाठी चांगला उपयोग झाला. मित्राकडे हे पुस्तक पहिले होते. आवडलं म्हणून दोन प्रति मागवल्या. पुस्तकातील माहिती खूप उपयुक्त आहे.

face

विनायक अशोक लाड

मु.पो. भोसे, तालुका- मंगळवेढा, जिल्हा- सोलापूर.

कृषिरसायने पुस्तकाचा मला माझ्या वांगी आणि द्राक्ष पिकासाठी खूप फायदा झाला. आणि हा टोमॅटोवर फळमाशी पडते त्याबद्दल अजून कुठली रसायने असली तर माहिती सांगा.

face

राहुल रामचंद्र सूर्यवंशी

मु.पो. हेलगाव, तालुका- कऱ्हाड, जिल्हा- नाशिक.

नोंदणी करा आणि मिळवा

संपादकीय विभाग

मुख्य संपादक


डॉ. नरेश शेजवळ, एम्.एस्सी. (जीवरसायनशास्त्र, बंगळूर विद्या.) पीएच.डी. (प्राणीशास्त्र, मुंबई विद्या.) सह. प्राध्यापक प्राणीशास्त्र (पुणे विद्या.).

“विश्वसनीय स्त्रोतांतील गुणवत्तापूर्ण माहिती आणि कृषी क्षेत्रातील सद्यस्थितीतील परिस्थितीचे अचूक सखोल विश्लेषण भारतीय कृषिउद्योग आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरतील.”
डॉ नरेश शेजवळ एक जिज्ञासू संशोधक, लेखक, विश्लेषक आणि अध्यापक असून यांस विविध जैविक शास्त्रांतील ८ वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपले ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग कृषिसंशोधन विकासासाठी करण्यासाठीचे योजिले आहे. संशोधक, कृषिउद्योजक शेतकऱ्यांशी सहज संपर्क करू शकतील अशी अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीची निर्मिती केली आहे. विविध राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये भाग घेऊन संशोधनाचे सादारीकरण केले असून नामांकित अंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये 2 शोधनिबंध नावावर असून १ भारतीय पेटंट दाखल केलेलं आहे.

व्यवस्थापन संपादक


श्री. निलेश शेजवळ, बी.ई. (आईएमई), एम्.बी.ए. (विपणन, ऑस्ट्रिया विद्या.)

“कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच शेतीसाठी धोरणे, सुनियोजित व्यवस्थापन आणि विपणन कौशल्ये असावीत. आम्ही शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी तत्पर असे तज्ञ आणि उद्योगांस आकर्षित करताना कृषिउद्योगविश्वातील माध्यम सेवांतील नवे मापदंड उभारत आहोत.”
हे एक अभियंते, तज्ञ व्यवसाय विश्लेषक आणि विपणन तज्ञ असून शेतीला व्यवसायिक अंगानेच पाहतात. १० वर्षांहून अधिकचा कृषि विपणन, व्यवसाय विश्लेषण आणि उद्योगविकासासाठीच्या माहिती-संपर्क- तंत्रज्ञान वापराबाबतचा अनुभव आहे. कृषिउद्योगातील क्षमता ओळखून त्यातील गरजांचा अभ्यास करून त्यांनी आपले लक्ष माहिती-संपर्क- तंत्रज्ञान आधारीत कृषिविपणनावर केंद्रित केले आहे.

लेखक


डॉ. अंकुश चोरमुले, M.Sc., Ph.D. (Agri.) कृषी कीटकशास्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

हे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे कृषी कीटकशास्र विभागाअंतर्गत 'पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला' प्रकल्पात संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत आहे. त्यांनी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून पदव्युत्तर पदवी व कृषी विद्यापीठ राहुरी येथून आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधरा शोधनिबंध, दोन पुस्तके, व दीडशेच्या वर मराठी लेख प्रकाशित झालेले आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना विविध संस्थांकडून 'युवा संशोधक', 'उत्कृष्ट लेखक' व 'महाराष्ट्र विभूषण' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तज्ज्ञ म्हणून सहभागी होण्यासाठी