कृषिकिंग विषयी

२०१३ पासून कृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. २५ लक्षहून अधिक शेतकऱ्यांना एसएमएस, मासिक आणि कृषिकिंग अॅपद्वारे सर्वोत्तम गुणवत्तेची माहिती आणि बाजार विश्लेषण पुरवित आहे.

२०१५ पासून कृषिउद्योगास व्यवसाय विस्तारासाठी लागणाऱ्या बी२बी सारखी नाविन्यपूर्ण व व्यावसायिक सेवा देत आहोत. डिजिटल उपस्थिती दर्शविण्यासाठी विविध कृषिसंस्था आमच्याकडून अॅप’ डेव्हलपमेंट, ग्राहक सेवा, कंटेंट आउटसोर्सिंग, कार्यक्रम व्यवस्थापन या सेवेचा लाभ घेत आहेत.

जवळपास १,०८,०००/- रु. बाजारमुल्याची सेवा आम्ही कृषिकिंग अॅप मधून शेतकऱ्यांना मोफत देत असल्याने शेतकरीवर्ग अत्यंत विश्वासाने आमच्याशी जोडला गेला आहे. मासिकातून अत्यावश्यक माहिती व विश्लेषण, आणि कृषि, उद्योग, अर्थ जगतातील चालू घडामोडीवर आम्ही केलेलं लिखाण कृषिउद्योग जगतात विशेष लोकप्रिय झाले आहे. यासोबतच उद्योग, सहकार व ग्राम संस्थांसाठी सुरु केलेल्या डिजिटल सेवा झपाट्याने विस्तारत आहेत.

आगामी २०१७ या वर्षात वरील सेवा इतर राज्यांतून आणि भाषांतून चालू करण्यात येणार आहे. भारतातील सर्व शेतकरी आणि कृषिउद्योजकांच्या विकासात आम्हाला योगदान देता येत आहे याचा आम्हास अभिमान आहे.