कृषिकिंग विषयी


कृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषीची तंत्रशुद्ध माहिती व सेवा पुरविते. वर्ष २०१३ मध्ये कंपनीने या क्षेत्रात पदार्पण केले असून अवघ्या तीन वर्षातच कंपनीशी संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील जवळजवळ २५ लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत


पूर्वी कंपनीने संदेश द्वारे(sms) शेतकऱ्यांना कृषीची माहिती व सेवा पुरविण्यास सुरुवात केली होती. आता डिजिटल तंत्रज्ञानाची सांगड घालून शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनीने ‘कृषिकिंग’ हे ‘अॅप’ तयार केले असून, आणि हे अॅप तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या नेटवर्कमार्फत अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाले आहे.


जून २०१६ मध्ये ‘अॅप’ने १०००० डाऊनलोडचा टप्पा ओलांडला होता, आणि हा आकडा आता ६५०००+ आहे. कृषिकिंगच्या प्रत्येक सेवेतून शेतकऱ्यांना मिळणारी माहिती व विश्लेषण, उपयोगितेच्या दृष्टीने एकमेकाद्वितीय असल्याने शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे.


या पार्श्वभूमीवर कृषिकिंगने एप्रिल २०१६ पासून ‘कृषिकिंग मासिक’ सुरु केले असून मासिकाला राज्यभरातून शेतकरी, लेखक व मान्यवरांचा अभूत प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच अंकात कृषी क्षेत्राचा चेहरा समजले जाणारे डॉ.स्वामिनाथन यांच्यासह अनेक दिग्गजांनी लेखन केले आहे. कमी कालावधीतच कृषिकिंग मासिकाचे वार्षिक वर्गणीदार ७००० हून अधिक झाले आहे. कृषिउद्योग, शेतकरी संस्था, व्यावसायिक, सहकार व ग्रामीण संस्था यांस प्रीमियम सुविधा असणारे तंत्रज्ञान दिले जात आहे. जानेवारी २०१६ मध्ये बंगरूळ येथे झालेल्या जागतिक विज्ञान परिषदेत शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या या ‘कृषिकिंग अॅप’चे सादरीकरण व शास्त्रज्ञांकडून कौतुक. यात कृषिकिंगची ३० हून अधिक तज्ज्ञांची टीम सतत तप्तर आणि कार्यरत आहे.